Sharad Pawar Group : अजित पवार गटाला मोठा धक्का! रामराजे निंबाळकर यांचे बंधू आणि पुत्राचा शरद पवार गटात प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार गटारे पुन्हा एकदा अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
Saam Tv
Ramraje Naik Nimbalkar Brother and Son Joins Sharad Pawar GroupSaam tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. यातच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा एक मोठा धक्का दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी फलटणचे विद्यमान आमदार दिपक चव्हाण यांच्यासह संपूर्ण राजे गट उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सामील झाला आहे.

Saam Tv
Maharashtra Politics: 'भाजपासाठी मी माझा बळी दिला', केसरकर यांच्या अडचणी वाढणार? महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

'मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही'

यावेळी बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, तुम्ही स्वगृही येत आहात तुमचं स्वागत. मला माहित होतं तुम्हा तिकडे करमणार नाही. आता योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे. राम कधी दिसत नाही, तसा राम आज आपल्याला मंचावर दिसत नाही, पण तो आहे, असं नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शरद पवार गटासोबत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ''रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात तुतारी वाजण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. संजीव राजे आणि दिपक चव्हाण यांच्या हातात तुतारी देतोय. मला माहिती आहे की, इथे काय अन्याय झाला आहे. पोलीस ठाण्याचा वापर किती टोकाचा झाला आहे.''

Saam Tv
Maharashtra Politics: 'भाजपासाठी मी माझा बळी दिला', केसरकर यांच्या अडचणी वाढणार? महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य करत आहेत ते म्हणाले की, ''विधानसभा निवडणुका ३ ते ४ दिवसात जाहीर होतील. फक्त फलटण नाही मानखटावची जागा पण तुम्ही निवडून आणा'', असं आवाहन पाटील यांनी यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com