Voters Registration Last Date : आताही मतदार नोंदणी करता येईल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

voters registration process in Marathi : आताही राज्यातील नागरिकांना मतदार नोंदणी करता येईल. त्यासाठी १९ ऑक्टोबरच्या नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे.
New Voter List in Marathi
New Voter List Saam Digital
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्यांनी नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही. त्यांना अजूनही १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी आहे.

या निवडणुकीआधी मतदारांनी स्वत:चं नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाल्याची खात्री करावी. तसेच ज्यांनी नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही, त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत नाव मतदार यादीत नोंदवावे. जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले.

New Voter List in Marathi
Maharashtra Election: मुख्यमंत्रिपद म्हणजे छातीवर दगड; शिंदे गटानंही दाखवला भाजपला त्यागाचा हिशोब

ज्यांनी नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही, त्यांना १९ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. तर निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.

New Voter List in Marathi
Maharashtra Assembly Election : अब्दुल सत्तार, संजय शिरसाट अन् अतुल सावे... छ. संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार ठरले, वाचा यादी

तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com