Maharashtra Politics : सात आमदारांनी साथ सोडली, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, कारवाई काय होणार?

ajit pawar News : अजित पवारांनी नागालँडमधील सात आमदारांच्या पक्षांतरावर भाष्य केलं. अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
ajit pawar News
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : अजित पवारांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे सात आमदार नागालँडमधील सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पक्षात प्रवेश केला आहे. नागालँडमधील सर्व राजकीय घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी नागालँडमधील राजकीय परिस्थिती सांगितली.

ajit pawar News
Corona Update : हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने वसईतील तरुणाचा बळी घेतला, परिसरात हळहळ

अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नागालँडमधील राजकारणावर भाष्य केलं. अजित पवारांनी म्हटलं की, 'मला दोन महिन्यांपूर्वी सगळे आमदार भेटले होते. त्यांची तिथं काम होत नव्हती. त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. त्याबद्दलची अधिक माहिती घेत आहे. त्यांनी स्वतः मला भेटून तक्रारी केल्या होत्या. सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल'.

पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवरही अजित पवारांनी भाष्य केलं. 'पंचनामे केलेले आहेत. जसे प्रस्ताव येतील, त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल. अचानक पाऊस आल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. कांदा उत्पादकांचं नुकसान झालं आहे. बजेटमध्ये तरतूद आहे, मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

ajit pawar News
Post Office Scheme : पैसा वसूल योजना! दिवसाला फक्त ५० रुपये खर्च करा अन् मिळवा ३५ लाखांचा परतावा, वाचा सविस्तर

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी समारोप घेतला. 'शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होता कामा नये. शेवटी तो आपला बळीराजा आहे. काही गोष्टी बोलून कशाला दाखवायचं? मनात ठेव्यायच्या. त्यांना मनात ठेवायची सवय नाही. त्याच्यामुळे असं होत आहे. मला जास्त महागात पडते', असे ते म्हणाले.

ajit pawar News
Fake Currency : तुमच्या खिशातील 500 ची नोट बनावट? RBIच्या अहवालात काय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचारांवरही अजित पवारांनी भाष्य केलं. 'तक्रारी केल्याशिवाय घटना कमी होणार नाही. कोल्हापूरमध्ये अशी एक घटना घडली. त्याचा तपास यंत्रणा करत आहेत, असे ते म्हणाले.

पुणे कार अपघातावर बोलताना अजित पवार म्हणाले, 'त्याची माहिती घेतली आहे. काय विद्यार्थी होते, त्यांची ही माहिती घेतली आहे. यांच्या परीक्षा संदर्भातल्या त्यांच्या संस्था आहेत, त्या निर्णय घेतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com