

मुंबई विमानतळावर एअर इंडिया व इंडिगो विमानांच्या पंखांची टक्कर
टेक-ऑफपूर्वी टॅक्सीवेवर घडली घटना
सर्व प्रवासी सुरक्षित, कोणतीही जीवितहानी नाही
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. टेक-ऑफपूर्वी टॅक्सीवेवर थांबले असताना सर्व्हिस ऑपरेशनदरम्यान एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपचा दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या विंगटिपला हलका स्पर्श झाला. या घटनेत एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपचे नुकसान झाले.
खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती नियामक संस्थेला देण्यात आली असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु विमानाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.