दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्त
दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्तSaam Tv

दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्त

मागील एक महिन्यापासून अवकाळी पावसादरम्यान कडाडलेला भाजीपाला मागील २ दिवसांपासून स्वस्त झाला आहे.
Published on

पुणे : मागील एक महिन्यापासून अवकाळी पावसादरम्यान कडाडलेला भाजीपाला मागील २ दिवसांपासून स्वस्त झाला आहे. पिंपरीत लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत कोथिंबीर जुडी ८० आणि मेथीची जुडी ४० रुपयांवर गेली होती. ती जुडी अवघ्या ८ ते १० रुपयांना झाल्याने गृहिणींचा जीव आता भांड्यात पडला आहे. पेट्रोलियम पदार्थ तसेच घरगुती सिलिंडरचे भाव आणि त्यातच पालेभाज्यांच्या महागाईमुळे गृहिणींनी जेवणातून पालेभाज्याच वर्ज्य केल्याचे दिसून आले होते.

मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसादरम्यान पालेभाज्यांच्या भाववाढीने मोठ्या प्रमाणात उच्चांक गाठला होता. यामुळे, महिलांनी स्वयंपाकघरात दैनंदिन भाज्यांचे नियोजन करणे अवघड झाले होते. भाज्यांमध्ये कोथिंबिरीची फोडणीच गायब झाली होती. ८० रुपयांवर असलेली कोथिंबीर नंतर ५० रुपयांच्या आत आली. यानंतर २५ ते ४० रुपयांच्या दरम्यान विक्री होत होती. ती नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत १० रुपये जुडी झाली आहे.

हे देखील पहा-

त्यात देखील फळभाज्या चांगल्याच महागले होते. त्याचबरोबर भेंडी, गवार, टोमॅटो महागले आहे. टोमॅटो मागील आठवड्यात ५० रुपये किलोवर येऊन पोहचले आहे. पालेभाज्यांची मोठी आवक पिंपरी भाजी मंडईमध्ये बघायला मिळाली आहे. मात्र, एसटीचा संप सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गिऱ्हाई देखील मंदावले आहे. बरेच जण गावी अडकून पडले आहेत. त्यामुळे भाजी व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे.

दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्त
ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; लाखों रुपयांचे नुकसान

सध्या कोथिंबीर आणि शेपू किमान ७ रुपये भावाप्रमाणे विक्री आहे. मंडईत शेपू, पालक आणि कोथिंबिरीची आवक १५०० गड्डी इतकी मोठ्या प्रमाणात बुधवारी झाली होती. तर किरकोळ बाजारभावाने १० ते १२ रुपये प्रमाणे सर्वच पालेभाज्यांची विक्री सुरु आहे. तसेच पालक आणि अंबाडीची भाजीही सर्वाधिक १० रुपयाप्रमाणे स्वस्त झाली होती. कांदापात देखील ३० रुपयांवरून १५ रुपयांवर आला आहे.

यामुळे, मागील २ दिवसांत घरोघरी टेम्पो आणि हातगाडीवर विक्रीसाठी आलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. फळ व पालेभाज्या स्वस्त झाले आहेत. यामुळे पालेभाज्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी आहे. मागील महिन्यात पालेभाज्या महाग असल्याने विक्रीसाठी देखील भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते. अवकाळी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. परंतु, आवक होऊनही गिऱ्हाईक नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com