Maval Panchayat Samiti News : मावळ पंचायत समिती कार्यालयात 40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी सापडला

Vadgaon Maval Bribe News : लोहगड गावात सोलर प्रकल्प राबविण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला लाच मागितली.
extension officer of panchayat samiti held while taking bribe in vadgaon maval
extension officer of panchayat samiti held while taking bribe in vadgaon mavalSaam tv
Published On: 

Maval News : मावळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीवर प्रशासक असलेल्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

extension officer of panchayat samiti held while taking bribe in vadgaon maval
Success Story : ट्रकचालकाच्या मुलाची लंडनपर्यंत मजल, वाचा जय चाैधरीच्या जिद्दीची कहाणी

मावळ पंचायत समितीच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. अंकुश किसन खांडेकर असं अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईनंतर शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ माजली.

extension officer of panchayat samiti held while taking bribe in vadgaon maval
Childrens Passed Away : निरागस मुलांनी संपवली जीवन यात्रा, पाेलीस कुटुंबियांसह शेतमजूरांना धक्का

अंकुश खांडेकर हे मावळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान लोहगड गावात सोलर प्रकल्प राबविण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला लाच (bribe) मागितली.

याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून विस्तार अधिकाऱ्याला अलगद पकडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

extension officer of panchayat samiti held while taking bribe in vadgaon maval
Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.