Titwala News: टीटवाळ्यात १८ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी हवालदारास अटक

Bribe Case: तडजोडी अंती प्रत्येकी २ हजार कमी करत अटक न करण्यासाठी १८ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
ACB, Bribe
ACB, BribeSaam Tv
Published On: 

- अभिजित देशमुख

Titwala Police Station : टिटवाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तीन महिलांना (women) अटक (arrest) न करण्यासाठी १८ हजारांची लाच (bribe) मागणाऱ्या हवलदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (thane anti corruption bureau) अधिकाऱ्यांनी अटक केली. धनंजय फर्डे असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.

ACB, Bribe
Raju Shetti Tweet: लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !! 'सत्तेत आल्यावर त्यांचीही फ्यूज उडाली'

टीटवाळा परिसरातील ३ महिलांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात या महिलांना अटक न करण्यासाठी टीटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार धनंजय फर्डे यांनी प्रत्येकी ८ हजार याप्रमाणे २४ हजाराची मागणी केली होती. (Maharashtra News)

ACB, Bribe
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

तडजोडी अंती प्रत्येकी २ हजार कमी करत अटक न करण्यासाठी १८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने टिटवाळा परिसरात सापळा रचत तक्रारदाराकडून १८ हजार रुपये स्वीकारताना फर्डे यांना रंगेहाथ अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.