Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार? शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा, चर्चांना उधाण

aamir khan on devendra fadnavis : आमिर खानने देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय.
 देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार? शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान, एका कार्यक्रमात अभिनेता आमिर खानने देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर खानने शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यात जैन समाज संघटनेने एका अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमिर खान यांनी हजेरी लावली. यासहित या कार्यक्रमाला पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ,भीमराव तापकीर,हेमंत रासने,योगेश टिळेकर,सुनील कांबळे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

 देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार? शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा
Maharashtra Politics : पराभूत उमेदवाराला जास्त मतदान कसं? गावकऱ्यांना ईव्हीएमवर शंका, फेरमतदान घेणार

आमिर खानकडून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा

या कार्यक्रमात बोलताना आमिर खान म्हणाला की, पाणी फाऊंडेशनसाठी सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस यांची साथ राहिली आहे. आम्ही आठ वर्ष सोबत काम करत आहोत. मी घाबरत होतो, पण त्यांनी सांगितलं की, घाबरू नका. आपल्याला एकत्रित काम करण्याची संधी मिळणार आहे. पाणी फांऊडेशनसाठी अजून काम करायचे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्रित काम करू. देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा आहेत'.

 देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार? शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातही भाजपचं धक्कातंत्र? पुन्हा फडणवीस येणार की दुसरं कुणी?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, 'आमिर खान यांना श्रेष्ठ व्यक्ती म्हणून मी बघतो. जैन समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन संस्कृती राजधानी पुण्यात हो आहे. जैन समाजाचा कार्यक्रम हा केवळ समाजाचा नाही तर भारताच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. जीडीपी वाढवण्याचा रस्ता जैन समाजातून जातो. जैन गुरुंनी समाजाला शिकवण दिली आहे. जैन समाज जेवढं कमावतो. तेवढं दान देखील करतो. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायची असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल'.

 देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार? शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा
Devendra Fadnavis : सरकार स्थापन होण्याआधीच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये

'महाराष्ट्रात ५० टक्के अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. संविधान मूल्य समजली तरच आपली मुलं चांगली नागरिक बनू शकतात. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं होतं. त्याच वेळेस मी सांगितलं होतं की, काहीही झालं आणि कितीही काम असलं तरी मी या कार्यक्रमाला येणार आहे. सरकारी शाळेत शिक्षण चांगलं दिलं जातं. सरकारी शाळेत शिक्षण खराब असतं, असं बोललं जातं. पण महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला आहे. आज अनेक मुलं सरकारी शाळेत शिकत आहेत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com