Alibaug News: फिरायला गेला अन् काळाने घाला घातला; अलिबागच्या समुद्रात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

A Boy Drowned in Alibaug Sea: अलिबागच्या समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला अलिबागला गेला होता.
Alibaug News
Alibaug NewsSaam Tv
Published On

अलिबागच्या समुद्रात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत फिरायला गेला असताना ही घटना घडली आहे. गुरुवारी १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली आहे. हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी गेला असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अविनाश शिंदे असं मृत तरुणाचे नाव आहो. अविनाश हा मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. अविनाश पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून मित्रांसोबत अलिबाला गेला होता. तिथे समुद्रकिनारी आल्यानंतर अविनाश एकटात पोहण्यासाठी पाण्यात उतरला. समुद्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. समुद्रातून तो त्याच्या मित्रांना हात करत होता. मात्र, काही वेळातच तो दिसेनासा झाला. त्यावेळी जीवरक्षकांनी लगेचच पाण्यात उडी घेतली. परंतु जीवरक्षक तरुणाला वाचवण्यात अयशस्वी ठरले. जीवरक्षक आणि पोलिसांनी अविनाशला शोधण्याचा प्रयत्न केला असता कोर्टाच्या मागील बाजूल किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. अविनाशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Alibaug News
Anna Hajare: ईडीसारखे गुन्हे असलेले राजकारणी नको; निष्कलंक उमेदवार निवडा', ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आळंदी येथे एका कंपनीत काम करत होता. त्याचे चार मित्रदेखील त्याच कंपनीत काम करत होते. पावसाळ्यात सुट्ट्य एन्जॉय करण्यासाठी हे मित्र अलिबागला गेले होते. अविनाशच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्राला सतत भरती येत असते. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचे धाडस करु नका. त्यामुळे तुम्ही जीव गमावू शकता, असे सांगण्यात येत आहे.

Alibaug News
Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com