Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक

3 Days Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईत आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात होणार आहे.
Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक
Navi Mumbai Water ShortageSaam TV
Published On

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवी मंबईकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईत आठवड्यातून आता तीन दिवस पाणी कपात होणार आहे. तीन दिवस पाणी कपात म्हणजे आठवड्यातून ४ दिवस पूर्णवेळ पाणी येणार आहे.

मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावत जात असल्याने महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळा सुरु झाला असला तरीही अजूनपर्यंत आवश्यक तितका पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नवी मुंबईत तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणा आहे. हे तीन दिवस फक्त सकाळीच पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्यास सांगण्यात येत आहे.

नवी मुंबईत पुढील आठवड्यापासून तीन दिवस पाणी कपात होणार आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांचे मात्र हाल होणार आहे. मोरबे धरण क्षेत्रात पावसाने दांडी मारली आहे. पाऊस नसल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक
Ice cream : ऑनलाईन आईसस्क्रिम मागवताय, सावधान! आईसस्क्रीममध्ये सापडलं माणसाचं बोट; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने आता पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास धरणे भरण्यास मदत होईल. ठाण्यातील तानसा धरणात फक्त 35.33 % टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर मोडकसागर धरणात 38.02 % टक्के पाणीसाठी आहे.भातसा धरणात 23.49 % पाणीसाठी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक
Nitin Bangude Patil: ध्येय गाठायचं असेल तर.., नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com