

सिद्धेश म्हात्रे
Panvel News: पैसे कमावण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करणे एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. कर्ज काढून ऑनलाइन जुगाराच्या अॅपवर पत्त्यांचा डाव रंगवला. मात्र, सर्व पैसे हरल्याने या व्यक्तीने जीवन संपविले आहे. (Latest Marathi News)
पनवेल येथील संजय जनत्रा या व्यक्तीला ऑनलाइन जुगार खेळण्याचे व्यसन जडले. शॉर्टकटमध्ये पैसे कमाविण्यासाठी या व्यक्तीने चक्क कर्ज काढून ऑनलाईन जुगाराच्या अॅपवर पत्त्यांचा डाव खेळला. मात्र, हा डाव कधी रंगलाच नाही आणि कर्जाचे सर्व पैसे खर्च झाले. हातात आलेले पैसे गेले आणि डोक्यावरील कर्ज वाढल्याने नैराश्येत गेलेल्या संजय जनत्रा यांनी घरी कोणी नसताना आत्महत्या करत जीवन संपवले.
संजय यांचा पाणी पुरवठ्याचा व्यवसाय होता. मात्र, व्यवसायातील आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ऑनलाइन जुगाराचा शॉर्टकट स्वीकारला आणि घात झाला. आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून शॉर्टकटमधून पैसे कमाविण्यासाठी कर्ज काढले. मात्र, त्यात यश आले नसल्याने आत्महत्या केली असल्याचे लिहिले. ५५ वर्षीय संजय यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका तरुणाला कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय युवकाने जीवन संपविले होते. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ही घटना घडली होती. रोहित संजय वाघ असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
'मी लुझर आहे, मी असतांनाही आई वडीलांना काम करण्याची वेळ येते ही लाजिरवाणी गोष्ट आहे' अशी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी त्याने लिहिली आहे.
रोहित मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे घेतले शिक्षण घेतले होते. रोहित हा एका कंपनीमध्ये काम करत होता. मात्र त्याला कंपनीतून ब्रेक मिळाला, ती नोकरी सुटली. त्यानंतर पुन्हा एकदा तो नव्याने कामाच्या शोधात होता. त्याला जॉब मिळाला. मात्र पगार अवघा 15 हजारच होता. एवढ्याशा पगारांमध्ये काय होणार असा प्रश्न त्याच्या समोर होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.