Weather Update : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Weather update in Marathi : मुंबईसह कोकणात चार जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे पूर्व विदर्भातही वातावरणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
उन्हाचा तडाखा वाढला, मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Akola Heat Wave AlertSaam Digital

रायगड : केरळात मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यामुळे आता राज्यात १० जूनला राज्यात पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे हवामान विभागाने मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कोकणातील चारही जिल्ह्यात सलग तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पूर्व विदर्भातही वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे.

राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातील मुंबई, कोकणातील चार जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. कोकणातील चार जिल्ह्यात आजपासून सलग तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने इशारा दिला आहे.

उन्हाचा तडाखा वाढला, मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Weather Forecast : मान्सून केरळमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; महाराष्ट्रातील 'या' भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

पूर्व विदर्भातही वातावरणात बदल होणार

पूर्व विदर्भात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात तीव्र तापमान राहणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४७ अंशाच्या घरात राहण्याची शक्यता आहे. १ जूननंतर तापमानात घट होईल. तर २ जूनला मध्य स्वरुपाचा पाऊस राहील. २ जूनला रात्रीच्या तापमानात घट होऊन पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाने दर्शवलं आहे.

नागपूर शहरात चार केंद्र आहे. यात रामदासपेठ येथील केंद्रावर नोंदवलेले तापमान सेन्सरमध्ये त्रुटी असल्याने त्रुटीचं तापमान नोंदवलं आहे. मात्र, याच ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने सुद्धा तापमान मोजले, तेव्हा तापमान ४५ अंशाच्या घरात होते.

उन्हाचा तडाखा वाढला, मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Mumbai, Konkan Weather Forcast: गुड न्यूज! वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?

परभणीत तापमानाचा पारा स्थिर, मात्र उकाडा कायम

परभणीसह ग्रामीण भागात तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअस स्थिर आहे. नागरिकांना दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा सहन करावा लागत आहे. यामुळे रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी दिसून येत आहे. तापमान कमी झाला तरी उकाडा कायम आहे, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com