Mumbai News : भाजप आमदारासमोरच समर्थकांंची BMC कंत्राटदाराला मारहाण; VIDEO बघा

bjp party workers beaten to bmc contractor : मुंबई भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी बीएमसी कंत्राटदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. आमदर योगेस सागर हे चारकोप विधानसभेचे आमदार आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
भाजप आमदारासमोरच समर्थकांंची BMC कंत्राटदाराला मारहाण; VIDEO बघा
Mumbai News Saam tv
Published On

मुंबई : मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून बीएमसी कंत्राटदाराला मारहाण करण्यात आली आहे. भाजप आमदार योगेश सागर यांच्या समर्थकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केली. मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चारकोप भागातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार करत आमदार योगेश सागर यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला जाब विचारला. आमदार योगेश सागर यांनी भररस्त्यात कंत्राटदाराला निकृष्ट कामाबाबत जाब विचारला. मात्र, यावेळी आमदार योगेश सागर यांच्यासोबत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप आमदारासमोरच समर्थकांंची BMC कंत्राटदाराला मारहाण; VIDEO बघा
Lok Sabha Result Prediction: महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी, कुणाची जादू चालणार? आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

भाजप आमदार योगेश सागर यांनी काल चारकोपमधील रस्त्यांच्या कामाविषयी जाब विचारला. तसेच योगेश सागर यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ देखील केली. यावेळी योगेश सागर यांनी पालिका अधिकाऱ्याची डायरी आणि कामकाजाचे पेपर देखील नाल्यात फेकून दिले. पालिका कंत्राटदाराला नाल्यात फेकून देण्याची धमकी देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. कंत्राटदाराचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप आमदारासमोरच समर्थकांंची BMC कंत्राटदाराला मारहाण; VIDEO बघा
Mumbai Vikhroli News | म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन वृद्धांचा मृत्यू

आमदार योगेश सागर यांच्या मारहाणीवर मनसेची प्रतिक्रिया

चारकोपमधील घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिनेश साळवी म्हणाले, 'ज्यांना जी भाषा कळतं, त्या लोकांना त्याच भाषेत उत्तर देण्याची मनसेची खळखट्याकची भाषा भाजप आमदारांनाही पटायला लागली आहे. ज्या वेळेला मनसेची पदाधिकारी लोकांच्या हितासाठी कायदा हातात घेत होते, त्यावेळी भाजप आमदार मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करत होते. आता या आमदारावर कारवाई होणार का, आमचं म्हणणं एकच आहे की, कायदा सर्वांना एकच असला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com