Mumbai News: 24 वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; शिवडी टीबी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये एका २४ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai News
Mumbai Newssaam tv
Published On: 

सचिन गाड

Mumbai News: शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये एका २४ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आदिनाथ पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये एका २४ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन घेऊन जीवन संपवलं आहे. शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये MD मेडिसिन्सच्या प्रथम वर्षात होते. टीबी हॉस्पिटल मध्ये KEM रुग्णालयाचे दोन वॉर्ड आहेत. डॉक्टर आदिनाथ पाटील यांची ड्युटी लागली होती.

Mumbai News
Kalyan Crime News: पत्नीच्या धमक्यांमुळे पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; कुटुंबीयांचा आरोप, कल्याणमधील धक्कादायक घटना

नेमकं काय घडलं?

रविवारी काम संपल्यानंतर ते टी बी हॉस्पिटल मधील विश्रांती गृहात थांबले होते. सकाळी आठ-साडे आठच्या दरम्यान डॉक्टर आदिनाथ पाटील त्यांच्या खोलीतच बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तात्काळ KEM रुग्णालयात नेण्यात आलं, जेथे त्यांना दाखल करताच मृत घोषित करण्यात आलं.

पोलिसांनी विश्रांती गृहातून इंजेक्शन जप्त केली आहेत. रूममधून कोणतीही सूसाईड नोट जप्त करण्यात आली नसून डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मूळचे जळगावचे असलेले आदिनाथ पाटील यांचे वडील आणि भाऊ हे तिघेही डॉक्टर आहेत. दरम्यान आरए के मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR ) नोंद करत तपासाला सुरवात केली आहे.

Mumbai News
Sambahji Bhide Controversy : भिडे गुरुजींना अटक करा; महाविकास आघाडीची मागणी

सी-लिंकवरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने सी-लिंकवर येऊन कार पार्क केली. त्यानंतर समुद्रात उडी मारली आहे. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा नौदलाकडून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एकाने कार पार्क करत समुद्रात उडी मारली आहे. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा नौदलाकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.