Pune News: शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल २१४ शाळांचा शून्य टक्के निकाल; शिक्षण विभागाचा संताप; शिक्षकांची वेतनवाढच रोखली!

Pune Zilla Parishad 5th std Scholarship Exam Result Zero percent: पुण्यातून इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासंदर्भात धक्कादायक बाब समोर आलीय. सुमारे २१४ शाळेंचा निकाल या परिक्षेत शून्य टक्के लागला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासंदर्भात धक्कादायक बाब
5th std Scholarship ExamSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

राज्यात नुकत्याच झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतल्याचं समोर (Pune Zilla Parishad School) आलंय. याप्रकरणी आता २१४ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतन वाढ रोखण्याचा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आलाय.

शिक्षण विभागाचा संताप

याप्रकरणी शिक्षण विभागाचा संताप आता पाहायला मिळतोय. संबंधितांवर कारवाई करण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली (Pune News) आहे. शिक्षकांची वेतनवाढ आता याप्रकरणी रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

शिक्षकांवर कारवाईचा बडगा

इयत्ता पाचवीची वर्गाच्या मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात (Scholarship Exam Result) येते. त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी घेणे, त्यांना परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे.पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासंदर्भात धक्कादायक बाब
NEET Exam: केंद्र सरकार रिटेस्ट घेण्यास इच्छुक नाही, सिद्धार्थ शिंदे महत्त्वाचं बोलले...

२१४ शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के

तब्बल २१४ शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला (Education Department) आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता अॅक्शन मोडमध्ये आलंय. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने २१४ शाळेतील संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे संबंधित शाळांच्या शिक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासंदर्भात धक्कादायक बाब
MU Exam Postpone: हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा! मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पुढील ४८ तास महत्वाचे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com