Whale Fish Dead: १५ फूट लांब अन् तब्बल १५०० किलो वजन, वरसोली समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा; बघ्यांची उसळली गर्दी!

whale Fish Death: प्राथमिक तपास आणि चाचणी पूर्ण करून मृतदेह समुद्रकिनारी पुरण्यात आला. तसेच तज्ज्ञांच्या अभ्यासासाठी याचे नमुने वनविभागाने आपल्याकडे ठेवले आहेत.
Whale Fish Dead: १५ फूट लांब अन् तब्बल १५०० किलो वजन, वरसोली समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा; बघ्यांची उसळली गर्दी!
whale Fish Death: Saamtv
Published On

अलिबाग, ता. २ ऑगस्ट २०२४

अलिबागमधील वरसोली समुद्रकिनारी तब्बल १५ फूट लांब आणि १५०० किलो वजनाच्या बलेन व्हेल माशाचा मृतदेह आढळून आला. रविवारी (१, सप्टेंबर) ११ वाजण्याच्या सुमारास मासेमाऱ्यांना हा मासा आढळला, ज्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Whale Fish Dead: १५ फूट लांब अन् तब्बल १५०० किलो वजन, वरसोली समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा; बघ्यांची उसळली गर्दी!
Pune News : वनराज आंदेकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; गोळीबाराचा VIDEO आला समोर, तिघांना अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबागमधील वरसोली समुद्रकिनारी तब्बल १५ फूट लांब आणि १५०० किलो वजनाच्या बलेन व्हेल माशाचा मृतदेह आढळून आला. रविवारी (१, सप्टेंबर) ११ वाजण्याच्या सुमारास मासेमाऱ्यांना हा मासा आढळला, ज्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

रविवारी सकाळी हा 18 फूट लांबीच्या बलेन व्हेलचा मृतदेह किनाऱ्यावर वाहून गेला. भरतीच्या वेळी सकाळी ११ च्या सुमारास स्थानिक मच्छिमारांनी वनविभागाच्या खारफुटी कक्षाला या घटनेची माहिती दिली होती. याबाबतची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने घटनास्थळी व्हेलची पाहणी केली. प्राथमिक तपास आणि चाचणी पूर्ण करून मृतदेह समुद्रकिनारी पुरण्यात आला. तसेच तज्ज्ञांच्या अभ्यासासाठी याचे नमुने वनविभागाने आपल्याकडे ठेवले आहेत.

Whale Fish Dead: १५ फूट लांब अन् तब्बल १५०० किलो वजन, वरसोली समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा; बघ्यांची उसळली गर्दी!
Maharashtra Politics: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? अजित पवार गट 60 तर शिंदे - भाजप किती जागांवर निवडणूक लढणार? वाचा...

तरंगणारा मृत मासा लाटांमुळे किनाऱ्याकडे येताना दिसला. समुद्राला कमी भरती असल्यामुळे वन अधिकाऱ्यांना व्हेलपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. हा भलामोठा मासा पाहण्यासाठी सुमारे 500 लोक समुद्रकिनाऱ्यावर आले होते. या व्हेलचे वजन सुमारे 1500 किलो असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या व्हेलच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसूनत्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी समीर शिंदे यांनी दिली आहे.

Whale Fish Dead: १५ फूट लांब अन् तब्बल १५०० किलो वजन, वरसोली समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा; बघ्यांची उसळली गर्दी!
UP Crime News : महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा वसतिगृहात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com