महाराष्ट्र म्हटलं की अनेक विविध गोष्टी नजरेत येतात. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरापासून ते गाव-खेड्यापर्यंत अनेक गोष्टीमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. या विविधतेत अनेक खाद्य संस्कृती भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. खास म्हणजे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे.
यामुळे या समुद्रकिनारा असलेल्या संपर्ण भागात मासेप्रेमी आपल्याला दिसून येतात. दरदिवशी या भागात येणारे पर्यटक विविध पद्धतीने बनवलेले मासे खातात. मासेमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या मासे दिसून येतात. मात्र सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क पुराच्या पाण्यात २५ किलोचा मासा जाळ्याला लागला. संपूर्ण व्हिडिओ नेटकरी वर्गात चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातल्या प्रयाग चिखली येथे पुराच्या पाण्यात २५ किलोचा मासा जाळ्याला लागला.उमेश सरनाईक मासेमारीसाठी गेले असताना त्यांनी आपल्या जाळ्यात 'कटला' मासा मिळाला. २५ किलोचा मासा जाळ्यात अडकल्याचे समजताच तो पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी प्रचंड गर्दी (crowd)केली होती.
व्हायरल होत असलेल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्ही पाहू शकता, सर्वत्र परिसरात पुराचे पाणी भरलेले आहे. याच पाण्यात तो मासा पाण्यातून उडी मारून बाहेर आलेला दिसत आहे. मात्र तुम्ही जर हा मासा नीट पाहिले तर कमीत कमी २५ किलो असा जाडसर आणि उंच असा मासा हा दिसून येईल. व्हिडिओ जसा पुढे जातो तसा, एका व्यक्तीने हा भलामोठा मासा हातात पकडला आहे. व्हायरल होताच असलेला व्हिडिओ कोल्हापुरमधील आहे.
सोशल मीडियावर याआधीही २५ किलोपेक्षा अधिक वजनाचे मासे(Fish) मिळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सर्व व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @saamtv या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'सापडला म्हणून लगेच पकडायची काय गरज आहे' तर आणखी काही यूजरने,' आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.