१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

Mumbai Coastal Road tunnel car fire incident : मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागल्यानंतर ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असूनही आपत्कालीन प्रतिसादाला विलंब का झाला?
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal Road
Published On

मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात एक अपघात झाला आणि ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळेतच काही काळ वाहतुकीचा बोजवारा उडाला. १४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर आपत्ती व्यवस्थापनाचे कसे तीनतेरा वाजले आहेत? पाहूयात हा रिपोर्ट.......

14 हजार 977 कोटींचा खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडमध्ये नेमकं काय घडलं?भारतातला पहिला अंडरवॉटर बोगदा असणाऱ्या कोस्टल रोडवर हाहाकार माजला.. 15 हजार कोटींचा मुंबईच्या कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळी बोगद्यात भर दुपारी साडेबारा वाजता एका धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट निघू लागले. क्षणात कारने पेट घेतला...गाडीतल्या चौघांनी कशाबशा बाहेर उड्या मारल्या आणि जिवाच्या आकांताने पळ काढला. मागे आगीचा भडका आणि पुढे जीव वाचवण्यासाठी धावणारे प्रवासी.. हा थरार पाहून इतर चालकांनी जागेवरच ब्रेक दाबले. काही गाड्यांनी बोगद्यातच गाड्या माघारी घेण्याच्या प्रयत्न केला. वेळ वाचवणारा हा रोड जीव धोक्यात आणणारा कसा ठरला पाहा...

कोस्टल बोगद्यात काय झालं?

दु. 12 वाजून 15 मिनिटांनी वरळीतून दक्षिण मुंबईला जाणाऱ्या बोगद्यात कारला आग

बोगद्यात प्रचंड वाहतूक कोंडी लोकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ

दु. 12.25 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल

दु. 12.40 मिनिटांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न

दु. 12.45 मिनिटांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दु. 12.45 मिनिटांनी फायर हायड्रंट कनेक्ट

दु. 12.50 मिनिटांनी आग विझवण्यास सुरुवात

दु. 1.05 मिनिटांनी आग आटोक्यात

दु.1.15 मिनिटांनी कुलिंग ऑपरेशन संपलं

दु. 1.30 मिनिटांनी बोगद्यातील ट्रॅफिक पूर्ववत

Mumbai Coastal Road
पहिल्याच पावसात गुणवत्ता 'मिसिंग'; मे महिन्यात उद्घाटन, 6 जुलैला कोसळली दरड

अपघातामुळे पेडर रोड परिसरात तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

कोस्टल रोडचं काम करण्यासाठी 6 वर्ष लागले, जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवण्यासाठी हा 11 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला. सुरक्षेच्यादृष्टीनं आपातकालीन यंत्रणा देखिल बसवण्यात आल्या. या कोस्टल रोडमधून प्रवास करणाऱ्यांसाठी नेमक्या काय आपातकालीन यंत्रणा आहेत पाहा...

कोस्टल रोडमध्ये लिनिअर हीट डिटेक्शन केबर बसवलीये. तापमानवाढ किंवा आग लागली की कंट्रोल रूमला जातो अलर्ट

सीसीटीव्ही आणि AIचा वापर करुन मॉनिटरिंग करत धूर, आग किंवा अपघातावर नजर.

SCADA कंट्रोल रूममधून सर्व यंत्रणांवर 24 तास देखरेख ठेवत अलार्म, वाहतूक नियंत्रणासाठी आपात्कालीन प्रतिसाद

प्रेशराईज्ड फायर मेन सिस्टीमद्वारे बोगद्यातील हायड्रंटमधून उच्च दाबाने पाण्याचा पुरवठा करून अग्निरोधक यंत्रणा

सॅकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीमद्वारे आग लागल्यावर धूर एका दिशेने बाहेर येतो, ज्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यास मदत

कोस्टल रोडवर आता इतकी सक्षम यंत्रणा असूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतका वेळ का लागला. बोगद्याच्या दोन्ही बाजूनला कंट्रोल रुम असतांना आग लागल्यावर या ठिकाणी प्रशासनाला पोहचण्यास वेळ का लागला. दृष्यांमध्ये काळा धूर सहज दिसतोय मग हा धूर खेचून बाहेर काढणारी यंत्रणा कार्यान्वित झाली होती का? जर अग्निरोधक हायड्रंट्स होते, तर आग विझवण्यासाठी पाण्याचे फवारे का सुटले नाहीत? काही दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवर दरड कोसळली, तिथला ढिगारा साफ करायला १९ तास लागले. आणि आता कोस्टल रोडवर एक गाडी पेटली तर संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थापन कोलमडून पडले. त्यामुळे कोस्टलच्या बोगद्यातली इमर्जन्सी सेवाच मिसिंग आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही मराठी.

Mumbai Coastal Road
Mumbai’s coastal road: मुंबई कोस्टल रोडचा गेमचेंजर कॉरिडोर; मरिन ड्राईव्ह ते भाईंदर होणार बुलेटच्या वेगाने प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com