Pune Accident : पुण्यात मांजरी उड्डाणपुलावर भीषण अपघात; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, मोठा भाऊ बचावला

Pune Manjari Flyover Accident : पुण्यातील मांजरी उड्डाणपुलावर भीषण अपघातात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
Pune Manjari Flyover Accident
Pune Manjari Flyover AccidentSAAM TV
Published On

सचिन जाधव

Pune Manjari Flyover Accident :

पुण्यातील मांजरी उड्डाणपुलावर काल, गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला धडक दिली. यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याचा मोठा भाऊ बचावला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रियाज अजिज खान (वय १४, राहणार वैशाली हॉटेल मागे, हडपसर) याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मोठा भाऊ इजाज (वय २१) या अपघातातून बचावला आहे. (Latest Marathi News)

रियाज आणि इजाज हे दोघेही घरगुती कामासाठी दुचाकीवरून जात होते. मांजरी उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. या अपघातात रियाजचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेला इजाज हा बचावला आहे. (Pune Accident)

इजाज हा दुचाकी चालवत होता. त्याच्या मागे रियाज बसला होता. दोघेही हडपसरवरून मांजरीच्या दिशेला जात होते. मांजरी उड्डाणपुलावरून जात असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. पाठीमागे बसलेल्या रियाजला डंपरने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Pune Manjari Flyover Accident
Kalyan Railway Accident : कल्याणमध्ये विचित्र रेल्वे अपघात, डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून उतरताना एका प्रवाशाचा मृत्यू

दुचाकी चालवणारा त्याचा मोठा भाऊ हा दुसऱ्या बाजूला पडल्याने सुदैवाने तो वाचला. डंपरच्या चाकाखाली मुलगा सापडल्याचे बघितल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुण्यात काल सकाळीही एक अपघात झाला. हडपसरमध्ये एका डंपरच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली.

Pune Manjari Flyover Accident
Bhandara Crime News : भंडा-यात दाेन कुटुंबात वाद; एकाची हत्या, दाेघे जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com