11th Admission: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांत मोठा बदल!

11th Admission Process: अकरावीच्या अॅडमिशनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
11th admission
11th admissionSaam Tv
Published On

11 वीचे ऑनलाइन प्रवेश देताना शासनाने यावेळी इनहाऊस 10 कोट्याचे नियम बदलल्याने संबंधित पालक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. पालकांनी रितसर माहिती देऊन घेऊन या निर्णयला विरोध दर्शवलाय. या पूर्वी फर्ग्युसन सारख्या नामाकिंत कॉलेजमधे या कॉलेजची मूळ संस्था डीईएस संचलित शाळांमधील मुलांना 10 जागा कोटा राखीव असायचा. आता या नियमांत बदल करण्यात आला आहे.

11th admission
Pune Top 10 Colleges : अकरावीसाठी पुण्यातील टॉप १० कॉलेज; अ‍ॅडमिशन घेतल्यावर आयुष्यच बदलेल

यावेळी शासनाने फर्ग्युसन कॉलेजच्या नियमांत बदल करून फक्त त्या कॉलेजच्या कँम्पसमधील शाळांमधील विद्यार्थी यांना 10 टक्के कोटा उपलब्ध असेल. त्याच संस्थेमार्फत इतरत्र चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील मुलांना या 10 टक्के कोट्यातून यापुढे प्रवेश मिळणार नाहीत. त्यामुळे आता संस्थेच्या इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी कोट्यअंतर्गत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे आहे ते मात्र निराश झाले आहेत.

यामुळे नामांकित कॉलेजेसच्या शाळांमधील विद्यार्थी - पालक वर्गाची मोठी अडचण झालीये. म्हणून त्यांनी शिक्षण मंञ्यांना भेटून हा जीआर रद्द करण्याची मागणी केलीय. नियमांत बदल झाल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

11th admission
11th Admission: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पुणे विभागात ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुणे विभागात बुधवारपर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेची नोंदणी केली अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिला फेरी चे अर्ज भरण्यासाठी ३ जून पर्यंत मुदत आहे. शिक्षण विभागाने अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया राबवली आहे. पुणे विभागात १ हजार ५३८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पाठोपाठ अहिल्यानगर मधून २२ हजार ३६४, सोलापूर जिल्ह्यातून १४ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे

11th admission
11th Admission Process: अकरावीसाठी प्रवेश घेताय? कागदपत्रे कोणती लागणार? एका क्लिकवर जाणून घ्या प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com