11th Admission Process: अकरावीसाठी प्रवेश घेताय? कागदपत्रे कोणती लागणार? एका क्लिकवर जाणून घ्या प्रोसेस

11th Admission Process Step By Step Guide: अकरावीच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
11th Admission Process
11th Admission ProcessSaam Tv
Published On

अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीसाठी तुम्ही आता अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर अशा प्रमुख शहरांमध्ये नोंदणी सुरु आहे. तुम्ही https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

11th Admission Process
11th Admission: अखेर अकरावीच्या अ‍ॅडमिशनला सुरुवात, पसंतीचे १० कॉलेज निवडा, जाणून घ्या प्रोसेस

१. अकरावीच्या प्रवेशाची अर्जप्रक्रिया (How to apply 11th admission form online?)

  • सर्वप्रथम तुम्हाला https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटवर जायचे आहे.

  • त्यानंतर नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन (New Student Registration)नोंदणी करायची आहे.

  • यानंतर तुम्हाला फॉर्म १ भरायचा आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती आहे.

  • यानंतर काही कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.

  • यानंतर तुम्हाला फॉर्म २ भरायचा आहे. यामध्ये तुमच्या प्राधान्यानुसार कॉलेजची नावे टाकायची आहे.

  • यानंतर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये कॉलेज लागले.

  • त्यानुसार तुम्ही महाविद्यालयात जाऊन प्रवेश घऊ शकतात.

11th Admission Process
Mumbai Top 10 Colleges: मुंबईतील या टॉप १० कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्या, शिक्षणासोबतच करिअरच्या संधी वाढतील

२.. अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (Which certificate/Documents are required for 11th admission in Maharashtra?)

  • १०वी बोर्डाचे मार्कशीट

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)

  • आधार कार्ड/रेशन कार्ड (Aadhaar Card/Ration Card)

  • उत्पन्नाचा दाखला

  • अल्पसंख्यांक प्रमाणपत्र

  • अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास)

11th Admission Process
Pune Top 10 Colleges : अकरावीसाठी पुण्यातील टॉप १० कॉलेज; अ‍ॅडमिशन घेतल्यावर आयुष्यच बदलेल

३. अकरावी प्रवेशासाठीचा अंडरटेकिंग फॉर्म म्हणजे काय? (What is undertaking form for 11th admission?)

अंडरटेकिंग फॉर्म म्हणजे हमीपत्र ज्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची परवानगी असले. त्यामध्ये दिलेली माहिती खरी आहे. जर खोटी आढळली तर प्रवेश रद्द केला जाई शकतो. सर्व अटी शर्ती मान्य आहेत. तसेच प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या नियमांचे पालन करावे लागेल, अशा आशयाचा फॉर्म असतो. तो भरायचा असतो.

४. ११वी साठी 'प्रोव्हिजनल प्रवेश' म्हणजे काय? (What is provisional admission in class 11?)

  • प्रोव्हिजन प्रवेश म्हणजे तात्पुरता प्रवेश.

  • प्रोव्हिजनल प्रवेश म्हणजे कागदपत्रे उपलब्ध नसताना दिला जातो.

  • निकाल उशिरा लागला किंवा शाळा सोडल्याचा दाखला उशिरा मिळाल्यास हा प्रवेश दिला जातो.

  • यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जातो.

५. अकरावीचे सर्टिफिकेट कसं मिळवायचं? (How can I get 11th certificate?)

  • ११वी पूर्ण केल्यावर तुम्हाला हे मार्कशीट कॉलेजकडून दिले जाते.

  • हे मार्कशीट कॉलेजकडून दिले जाते बोर्डाकडून नाही.

11th Admission Process
Thane Top 10 Colleges: ठाण्यातील टॉप १० कॉलेज; अ‍ॅडमिशन घेतलं की करिअर सेट

६. दहावी पास नसल्यासदेखील अकरावीला प्रवेश घेता येतो का? (Can I do 11th without 10th?)

नाही, १०वी पास असल्याशिवाय तुम्हाला अकरावीला प्रवेश घेता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्ड (SSC), CBSE / ICSE / NIOS / समकक्ष मान्यताप्राप्त बोर्ड या बोर्डातून परीक्षा पास केलेले असावे.

७. ११वीची मार्कशीट महत्त्वाची आहे का? (Is 11th Marksheet important?)

  • अकरावीची मार्कशीट खूप गरजेची आहे.

  • १२वीसाठी प्रवेश घेताना ही मार्कशीट गरजेची आहे.

  • शैक्षणिक नोंदीसाठीही ही मार्कशीट लागते.

  • जर तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेत असाल तर ही मार्कशीट तुम्हाला सबमिट करावी लागते.

८.पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय? (What is a passing certificate?)

तुम्ही जेव्हा बोर्ड परीक्षा (१०वी किंवा १२वी) पास करतात तेव्हा बोर्डाकडून हे सर्टिफिकेट दिले जाते.

11th Admission Process
Kalyan Top 10 Colleges: कल्याणमधील टॉप १० कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्या; शिक्षणासोबत करिअरच्या मिळतील अनेक संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com