Siddhi Hande
पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगसाठी जातात.
पावसाळ्यात तुम्ही पुण्याजवळ असलेल्या काही ठिकाणी ट्रेकिंगसाठी जाऊ शकतात. येथील सौंदर्य आणि ट्रेकिंगचा अनुभव खूप मस्त आहे.
लोहगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. येथे तुम्हाला हिरव्यागार निसर्गाचा अनुभव घेता येईल.
सिंहगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आहे. परंतु जेव्हा तुम्ही वर टोकावर पोहचता तेव्हा खूप मस्त वाटते. तिथून खाली पाहिल्यावर संपूर्ण पुणे तुम्हाला दिसेल.
पुण्यापासून अवघ्या ३ किलोमीटवर असलेल्या राजगडलादेखील तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकतात. येथे तुम्हाला लहान धबधबेदेखील पाहायला मिळतील.
विसापूर किल्ला हा त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी पहिल्यांदा जात असाल तर सोबत अनुभवी व्यक्तीला घेऊन जा.
पुण्यापासून १३ किलोमीटरवर कळसुबाई शिखर आहे. कळसुबाई शिखर हे सर्वात उंच आहे. येथील ट्रेकिंगचा अनुभव तुम्ही कधीच विसरणार आहे.
देवकुंड धबधबा हा खूप प्रसिद्ध आहे. येथेदेखील तुम्ही जाऊ शकतात. तुम्ही धबधब्याखाली मस्तपैकी भिजू शकता.