Tanvi Pol
मुसळधार पावसामुळे बदलापुरातील सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय.
पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोंडेश्वरकडे वळू लागली आहेत.
बदलापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे.
पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं.
जून महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते.
पहिल्यांदाच मे अखेरीस हा धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय.
मान्सूनचं लवकरच आगमन झाल्यामुळे बंदी आदेश लागू होण्यापूर्वीच पर्यटकांची पावलं कोंडेश्वर धबधब्याकडे वळाली आहेत.