10th Supplementary Exam: दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

10th Supplementary Exam For ATKT Students: दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. अपयश आले तरीही तुम्ही खचून जावू नका. तुम्हाला आता पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
10th Supplementary Exam
10th Supplementary ExamSaam Tv
Published On

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीनंतर आता विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करत आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. परंतु तरीही या विद्यार्थ्यांनी खचून जावू नये. दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

10th Supplementary Exam
11th Admission: कामाची बातमी! अकरावीच्या प्रवेशासाठी १० कॉलेज निवडता येणार, अ‍ॅडमिशनसाठी लागणार ६ कागदपत्रे, वाचा सविस्तर

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये ८६ हजार ६४१ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. तर ३४ हजार ३९३ विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २४ जून ते १७जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा(Supplementary Examination) घेण्यात येणार आहे.

एटीकेटीसाठी (ATKT) पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा होणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेतून दर्जा सुधारण्याची अन् उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे.

दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना ३५ पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्ही अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकणार आहात. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा एकदा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.

10th Supplementary Exam
11th Admission List: अकरावी प्रवेश प्रकियेची पहिली यादी आज होणार जाहीर; अशा पद्धतीने करा चेक

दहावीचा निकाल लागला आहे. यंदा दहावीचा निकाल गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत खूप कमी लागला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत तर अनेक विद्यार्थी काठावर पासदेखील झाले आहेत. काही विद्यार्थी नापासदेखील झाले आहेत. नापास झालेले विद्यार्थी लगेच टेन्शन घेतात. परंतु तुमच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. तुमची पुरवणी परीक्षा ४ जून ते १७जुलै या कालावधीत होणार आहे.

10th Supplementary Exam
11th Admission: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com