आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

कल्याणमध्ये १०८ रुग्णवाहिका तब्बल ४० मिनिट उशिरा पोहोचल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीचे आदेश जारी.
Ambulance
108 Ambulance,saam tv
Published On

108 नंबरवर कॉल केला, तर रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी यायला हवी...मात्र रुग्णांना वाचवणारी रुग्णवाहिकाचं तब्बल 40 मिनट उशीरा येत असेल तर रुग्णांच्या जीवाशी खेळणारी ही यंत्रणा नेमकं काय करतेय? असा प्रश्न निर्माण होतोय. कल्याणमध्ये आरोग्य व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगण्याचं काम कसं करण्यात आलंय ? पाहूयात या स्पेशल

कल्याण रेल्वे स्टेशनचा गजबजलेला परिसर. दीपक हॉटेल... आणि समोरच मृत्यूशी झुंज देणारे मेवालाल गुप्ता.... छातीत अचानक कळ आली, श्वास कोंडू लागला, त्यामुळे मदतीसाठी त्यांनी 108 नंबरला कॉल केला. वाटलं होतं काही मिनिटांत रुग्णवाहिका येईल आणि प्राण वाचतील. पण यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळं विपरीत घडलं...

हद्यविकाराचा झटका आल्यानंतर गुप्तांनी 10.09 मिनटांनी 108 नंबरवर फोन केला.. जवळच कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटल होतं... मात्र हॉस्पिटलमधून निघालेल्या रुग्णवाहिकेला स्टेशन परिसरात यायला तब्बल 40 मिनट लागले आणि रुगणांचा जागीच मृत्यू झाला... ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाचे भररस्त्यात वाभाडे काढले...

धक्कादायक म्हणजे रुग्णाला घेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी आली.. मात्र त्या रुग्णवाहिकेत डॉक्टरच नव्हते... डॉक्टर रुग्णवाहिकेच्या मागून आरामात स्वत:च्या खासगी गाडीवरून घटनास्थळी आल्याचाही आरोप स्थानिकांनी केलाय...

Ambulance
Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

दरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या डॉक्टरनं मात्र आपण अवघ्या 10 मिनटात घटनास्थळी पोहचल्याचं विधान केलयं..

दुसरीकडे साम टिव्हीच्या बातमीनंतर आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आदेश दिलेत...

रुग्णांना तात्काळ सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकारनं 108 हा क्रमांक जारी केला... मात्र खरचं या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका वेळेत येते का? आरोग्य यंत्रणांच्या या हलर्जीपणामुळे एकाचा जीव गेलाय... यासंदर्भात जरी आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले खरे... पण सर्वसामान्यांना या परिस्थितीला सामोरे जावं लागत असेल तर 108 नंबरचा नेमका उपयोग कुणाला?

संघर्ष गांगुर्डे आणि गणेश कवडेसह , वैदही काणेकर, साम टिव्ही न्यूज, मुंबई...

Ambulance
bypoll election : बारामती-राहुरी पोट निवडणुकीत किती टक्के लोकांनी केलं मतदान? कोण मारणार बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com