झटपट पैसे कमावणं महागात पडलं! शेअर मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने तरुणीला 10 लाखांचा गंडा

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MIDC Police Station
MIDC Police StationSaam Tv
Published On: 

संजय गडदे

मुंबई - गेल्या काही काळापासून तरुणांमध्ये शेअर मार्केट (Share Market) आणि क्रिप्टो कॉइन बाबतची मोठ्या प्रमाणात क्रेज वाढली आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी अनेक जण शेअर मार्केट आणि क्रिप्टो कॉइन मध्ये गुंतवणूक करत आहेत. पण मार्केट बाबत योग्य ज्ञान नसल्याने अशा तरुणांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील (Mumbai) एका तरुणीला चांगल्या परताव्याची लालच चांगलीच महागात पडली आहे. (Mumbai Crime News)

MIDC Police Station
Aurangabad : मुख्याध्यापकांच्या 'या' मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उतरलं मैदानात

अमेरिकेतील रोबोट कंपनीत गुंतवणूक करून चांगलं रिटर्न देण्याचं आमिष दाखवून नातेवाईक भामट्याने मुंबईतील तरुणीला तब्बल दहा लाख 87 हजारांचा चा गंडा घातला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नातेवाईक आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

रुची पांडे असं फसवणूक झालेल्या 27 वर्षीय तरुणीचं नाव असून ती मुंबईतील अंधेरी परिसरात वास्तव्याला आहे. फिर्यादी तरुणीने काही दिवसापूर्वी इसीई एप्लिकेशन्सच्या माध्यमातून अमेरिकेतील रोबोट निर्मिती कंपनीत दहा लाख 87 हजारांची गुंतवणूक केली. यानंतर तरुणीला परतावा म्हणून 5000 कधी दहा हजार अशी रक्कम मिळत असे.

मात्र कालांतराने ही रक्कम मिळणे बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब ध्यानात येतात सदर तरुणीने या भामट्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सायबर सायबर एक्सपर्ट पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.