

यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार नाहीत.
१६ मे ते १६ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेचं काम देण्यात आलं
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 10 हजारांहून जास्त पदं रिक्त आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर बदल्या करणं शक्य नाही म्हणून ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत आणि आंतरजिल्ह्याच्या बदल्यांची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना यंदा मोठा धक्का बसला आहे. चालू वर्षात कोणत्याही प्रकारच्या शिक्षक बदल्या होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांवर ज्या शिक्षकाला एकाच शाळेत ५ वर्षे पूर्ण होतात, त्यांची दरवर्षी दुसऱ्या शाळेमध्ये बदली केली जाते. जर आंतरजिल्हा बदली असेल तर त्याच जिल्ह्यात १० वर्षे सेवेची अट असते. यंदा शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जनगणनेचं काम दिलं होतं. 16 मे ते 16 जून या कालावधीमध्ये जनगणना आणि संबंधित सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना दिली होती. त्यामुळे या कामात नियुक्त शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती.
आत्तापर्यंत दरवर्षाला मे-जून महिन्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या पूर्ण केल्या जायच्या. पण यंदा जनगणनेमुळे आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया वेळेत पार पडू शकली नाहीये. आता पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होईल म्हणून बदल्या करणं व्यवहार्य नसल्याचं प्रशासनाचं मत आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या 10 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदं रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांचं स्थलांतर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच शिक्षकांनी आपल्या मुलांच्या शाळा, निवास आणि इतर कौटुंबिक कामाचं नियोजन केलेलं असतं. त्यामुळे जूननंतर बदल्या केल्यावर त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तसेच त्यांचा जास्त वेळ वाया जाऊ शकतो.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आता बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या पुढच्या वर्षी करण्यात येतील. यामध्ये विनंती बदली, पती-पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग शिक्षक आणि इतर सर्व प्रकारच्या बदल्यांचाही समावेश केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.