राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडं? आमदारानं अजितदादांचं नाव घेऊन भाजपला डिवचलं

Abhijeet Patil Claims Ajit Pawar Controls State Funds: राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. पंढरपूरमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी अजित पवारांकडेच तिजोरीच्या चाव्या असल्याचा दावा करत भाजपवर निशाणा साधला आहे.
NCP MLA Abhijeet Patil speaking on the Maharashtra treasury key controversy in Pandharpur.
NCP MLA Abhijeet Patil speaking on the Maharashtra treasury key controversy in Pandharpur.Saam Tv
Published On

भारत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: राज्यामध्ये काही दिवसांपासून सरकारी तिजोरीच्या चाव्या कोणाकडे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अर्थमंत्री अजित पवार असल्याने कोणाला किती निधी वर्ग करायचा साहजिकच हा निर्णय त्यांच्या हाती आहे. भाजपचे नेते म्हणता तिजोरीचा मालक देवाभाऊ आहे तर राष्ट्रवादीचे नेते म्हणता दादाच मालक. मात्र या सगळ्याला शिंदेंची शिवसेना अपवाद आहे. यावरूनच पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे.

विकास निधी कसा आणणार अस म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी चिमटा काढला आहे. आता तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत. त्यामुळे निधीची कमतरता राहणार नाही असा दावा ही आमदार पाटील यांनी केला आहे.

NCP MLA Abhijeet Patil speaking on the Maharashtra treasury key controversy in Pandharpur.
Beed News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह, बनावट आधारकार्डवर छापली खोटी जन्मतारीख; पोलिसांनी उधळला डाव

विकास निधीच्या वाटपावरून सध्या भाजप नेते आणि विरोधी शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.‌ त्यामुळे पंढरपुरात अजित पवार गटाची सूत्रे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे आली आहेत. त्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत. आमचा निधी कोणी आडवू शकत नाही असे ही आमदार पाटील यांनी सांगितले.

NCP MLA Abhijeet Patil speaking on the Maharashtra treasury key controversy in Pandharpur.
ZP Election: कोकणात पुन्हा बिनविरोध! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांना व पालकमंत्र्यांना दिवस झाले आहेत. निधी निधी अडू अशी भाषा करणाऱ्या नेत्यांना तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे असल्याचे सांगत नाही फक्त उत्तर दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी माझी सुरवाती पासून भूमिका होती असे आमदार पाटील यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com