Jalgaon: लॉजवर गेला अन् प्रेयसीला VIDEO कॉल केला, १ तास झाला तरी दरवाजा उघडेना, दरवाजा तोडून पाहताच समोर..

Young Man Ends Life After Video Call to Girlfriend: अहमदाबाद येथील तरूणाने जळगावच्या अमळनेर येथील लॉजवर येऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला होता.
Jalgaon
JalgaonSaam
Published On

जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहमदाबाद येथील तरूणाने जळगावच्या अमळनेर येथील लॉजवर येऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याआधी त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास करून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ शर्मा असे मृत तरूणाचे नाव आहे. हा तरुण अहमदाबाद येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ याच्याविरुद्ध अहमदाबाद येथे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. मृत तरूण आधी अहमदाबाद येथून जळगावच्या अमळनेरमध्ये गेला.

Jalgaon
Nagpur Crime: दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात

नंतर अमळनेर येथील बस स्थानकाजवळील लॉजवर गेला. लॉजवर गेल्यानंतर तरूणाने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला. नंतर रूममध्येच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शासकीय रूग्णालयात नेले.

Jalgaon
Sanjay Raut: 'टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा अन् गावागावात यात्रा काढा', महायुती सरकारवर राऊत बरसले

तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

Jalgaon
Shivsena: मोठी बातमी! ठाकरेंच्या आमदारावर गुन्हा दाखल, लग्नाच्या वरतीत तलवारीसोबतचा डान्स भोवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com