Nagpur Indira Gandhi Hospital: महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात बुरखा घालून फिरायचा तरुण, सुरक्षा रक्षकाने हटकले अन्...

Nagpur Police: नागपूरच्या तहसील पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
young man wearing burqa
young man wearing burqa Saam Tv
Published On: 

Nagpur News: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (Indira Gandhi Government Hospital) एक धक्कदायक घटना घडली आहे. या रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर असल्याचे भासवून एक तरुण बुरखा खालून फिरत होता. महिला सुरक्षा रक्षकांनी हटलकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. नागपूरच्या तहसील पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. जावेद शेख शफी शेख असं या तरुणाचे नाव आहे. तो हे कृत्य का करत होता याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

young man wearing burqa
Ram Lalla Abhishek ceremony: अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील - योगी आदित्यनाथ

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या 15 दिवसांपासून एक महिला बुरखा घालून फिरत होती. ही महिला स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगत फिरत होती. रुग्णालयामध्ये नवीन बुरखाधारी डॉक्टर आली असल्याचे सर्वांना वाटत होते. पण या महिला डॉक्टराच्या हालचाली संशयास्पद असल्याचे महिला सुरक्षारक्षकांना वाटले. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी या महिला डॉक्टरला हटकले.

young man wearing burqa
Jasprit Bumrah And Shreyas Iyer Comeback: टीम इंडियासाठी गुड न्यूज! 'या' दिवशी जसप्रीत बुमराह अन् श्रेयस अय्यर करणार कमबॅक

त्यानंतर त्यांनी या महिला डॉक्टरबद्दल पोलिसांना सांगितले. नागपूरच्या तहसील पोलिसांनी या महिला डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. तर धक्कादायक प्रकार समोर आला. या महिला डॉक्टरचा चेहरा पाहून पोलिसही चक्रावले. कारण गेल्या काही दिवसांपासून जी बुरखाधारी महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात फिरत होती ती डॉक्टर नाहीच. तर महिला नसून पुरुष असल्याचे उघड झाले.

young man wearing burqa
Google Vs European Union: अबब! गुगलला भरावा लागणार तब्बल 2296 कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

एक तरुण गेल्या काही दिवसांपासून बुरखा घालून महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात फिरत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. जावेद शेख असं या तरुणाचे नाव असून तो नागपूरमधील ताजबाग परिसरात राहतो. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यांना तीन मोबाईल सापडले. हा तरुण रुग्णालयात आलेल्या फक्त पुरुषांशीच गप्पा मारयचा. नेमकं त्याने हे असं कृत्य का केलं? तो मोबाईल चोरी करत होता का? या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com