Jasprit Bumrah And Shreyas Iyer Comeback: टीम इंडियासाठी गुड न्यूज! 'या' दिवशी जसप्रीत बुमराह अन् श्रेयस अय्यर करणार कमबॅक

Asia Cup 2023: भारतीय संघातील दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह आणि श्रेयस हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहेत
jasjrprit bumrah and shreyas iyer
jasjrprit bumrah and shreyas iyertwitter
Published On

Team India: भारतीय संघातील दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह आणि श्रेयस हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहेत. भारतीय संघाला अनेकदा या दोघांची कमतरता जाणवली आहे. मात्र भारतीय संघासाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे.

हे दोन्ही खेळाडू लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. नुकताच आशिया चषक स्पर्धेचं ठिकाण आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे. याच स्पर्धेतून हे दोन्ही खेळाडू कमबॅक करताना दिसून येऊ शकतात.

jasjrprit bumrah and shreyas iyer
Asia Cup 2023: BCCI ने विरोध करूनही Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात, पण...

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोघेही पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंवरून क्रिकेट शुजचे फोटो शेअर केले होते.

हा फोटो शेअर केल्यानंतर असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, तो लवकरच कमबॅक करणार आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्या पाठीच्या दुखण्यावर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

तर श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्याने बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत पुनरागमन केले होते. मात्र त्याची दुखापत वाढल्याने त्याला माघार घ्यावी लागली होती.

त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. श्रेयस अय्यरवर देखील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो देखील पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.(Latest sports updates)

jasjrprit bumrah and shreyas iyer
Suryakumar Yadav: मिस्टर ३६० ला बॉलिंग करताना पाहिलंय का? कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकत घेतला भन्नाट कॅच; VIDEO पाहायलाच हवा

आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात...

हायब्रिड मॉडेलनुसार केवळ ४ सामने हे पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे यजमान पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तर श्रीलंकेची चांदीच चांदी झाली आहे.

कारण यजमानपद नसताना देखील स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेची सुरुवात ३१ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com