Ram Lalla Abhishek ceremony In January 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी जानेवारीत अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व करतील अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली गुरुवारी दिली आहे. त्यांनी असेही सांगितले की या वर्षाच्या अखेरीस एका भव्य दीपोत्सवापूर्वी समारंभ होईल. त्यात अयोध्येमध्ये तब्बल 21 लाख दिवे प्रज्वलित केले जातील.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या महासंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून अयोध्येत मोठ्या सभेला संबोधित करताना योगी म्हणाले, "५०० वर्षांनंतर जेव्हा राम लल्ला आपल्या मंदिरात विराजमान होती, तेव्हा संपूर्ण जग पाहत राहिल."
मंदिर ट्रस्टचे पंतप्रधानांना 'निमंत्रण'
22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना आमंत्रित केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर योगी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असली तरी, आगामी काळात अयोध्येत आयोजित करण्यात येणार्या विविध कार्यक्रम आणि मोहिमांशी जोडले जावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप खासदारांना केले. (Latest Political News)
पंतधान मोदींची रामराज्याशी तुलना
योगा आदित्यनाथ यांनी अयोध्येचं वर्णन त्रेतायुगातील 'रामराज्या'सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा जिल्हा असे केले आहे. योगी आदित्यनात म्हणाले, "रामराज्याची संकल्पना साकार झाली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा अयोध्या त्रेतायुगाची आठवण करून देत आहे. आज अयोध्या केवळ त्याच दिशेने जात नाहीये, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गरीब देशाला नवी प्रेरणा देखील मिळत आहे असेही ते म्हणाले. (Bogus Seeds In State)
अयोध्येतील राम पथ
योगी आदित्यनात म्हणाले, येत्या चार ते सहा महिन्यांत अयोध्येतील रस्त्यांची तुलना दिल्लीतील राजपथावरील रस्त्यांशी होईल आणि आम्ही त्यांना रामपथ असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या सुग्रीव किल्ल्याजवळील रस्त्याला भक्ती पथ असे नाव देण्यात येणार आहे असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. तसेच अयोध्या, काशी (वाराणसी), मथुरा आणि प्रयागराज या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.