young farmer passes away in tiger attack near chandrapur
young farmer passes away in tiger attack near chandrapurSaam Digital

Chandrapur: वाघाच्या हल्ल्यात युवा शेतक-याचा मृत्यू, ग्रामस्थांचे प्रशासनाविराेधात आंदाेलन

या घटनेनंतर गावकऱ्यांनी रस्त्यात आंदाेलन करीत वारसाला नोकरी, जंगलाला कुंपण आणि बफर भागातील नीमढेला सफारी प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली.
Published on

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. श्रावण खोब्रागडे (वय 34) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी रास्ता राेकाे करीत वन विभागाला वाघाला पकडण्यासाठी तातडीने ठाेस पावलं उचला अशी मागणी केली. (Maharashtra News)

श्रावण खोब्रागडे हा स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता. रात्री उशिरा तो शौचास नाल्यानजीक गेला. त्यावेळी वाघाने त्याच्यावर झडप घातली. सकाळी श्रावण घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा रात्री घडलेली घटना समोर आली.

young farmer passes away in tiger attack near chandrapur
संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारामारी, Video Viral

या भागात वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेनंतर गावकऱ्यांनी रस्त्यात आंदाेलन करीत वारसाला नोकरी, जंगलाला कुंपण आणि बफर भागातील नीमढेला सफारी प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. वन आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून परिस्थितीवर मार्ग काढला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

young farmer passes away in tiger attack near chandrapur
Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यात गव्यांची दहशत पुन्हा वाढली, राधानगरीसह आज-यात कारला धडक; दाेघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com