प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. पाटणबोरी येथे यशवंत एनगुर्तीवार यांच्या स्टुडिओमध्ये या शिवरायांच्या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. (Latest Marathi News)
यवतमाळच्या कलावंताचं शिल्प दिल्लीमध्ये पोहोचलं आहे. या चित्ररथाचे उर्वरीत काम दिल्लीत पार पडले आहे. छत्रपती शिवरायांची लोकशाही प्रतिबिंबित भारताचा विकास, लोकशाही या विषयांना अनुसरून असलेल्या चित्ररथाचा समावेश आहे.
भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावरील राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचे लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह मॉ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. तर मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य दिसले. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात दिसून येत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून सहभाग जिल्ह्यासाठी अधिक अभिमानाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समुहामध्ये जिल्ह्यातील या कलावंतांचा समावेश कायम आहे. मागील कलावंतांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्याची जबाबदारी होती.
तसेच त्यांच्यावर उत्तरप्रदेश राज्यांचा अयोध्येतील दीपोत्सव संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्याची जबाबदारी आली होती. जिल्ह्यातील या कलावंतांनी ती जबाबदारी लिलया पेलत महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक प्राप्त करून दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.