Miraroad News: मिरारोडमध्ये तणावपूर्व शांतता; भाजप शांतीचा संदेश देण्यासाठी २६ जानेवारीला यात्रा काढणार

Miraroad latest News: शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भाजपकडून श्रीराम तिरंगा शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही यात्रा निघणार आहे.
BJP
BJP saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

Mira road Latest News:

शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भाजपकडून श्रीराम तिरंगा शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही यात्रा निघणार आहे. मिरारोडच्या गोल्डन नेस्ट,नया नगर,हैदरी चौक,मिरारोड स्थानक असा यात्रेचा मार्ग असणार आहे अशी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली. (Latest Marathi News)

मिरा भाईंदर शहरात मागील तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बुधवारपासून शहर सुरळीत सुरू झाले आहे. सध्या शहरात सर्व दळणवळण व्यवस्थित सुरू आहे. नया नगर परिसरात रविवारी सुमारास दोन गटात वाद झाला होता. त्यामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP
Maratha Protest Mumbai: जरांगेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने, वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना या वेळेत घातली बंदी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिकदृष्ट्या तपास पोलिस करत आहेत. या घटनेत दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई होणार अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहरात झालेल्या या वादाचे पडसात शहरातील परिसरात पाहायला मिळाले. काही किरकोळ ठिकाणी तोडफोड करण्यात आली. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मिरारोड भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

BJP
Goregaon Fire: राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अग्नितांडव; पुलाजवळील गोडाऊनला आग, १२ अग्निबंब घटनास्थळी

मात्र, शहरात अशांतता असल्याने येणाऱ्या २६ जानेवारी रोजी श्रीराम तिरंगा शांती यात्रा मिरारोड परिसरातून काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरात आम्ही सर्व एक आहोत असा चांगला संदेश देणार आहोत, अशी माहिती आयोजक भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com