Yavatmal News: मानसिक त्रास आणि अपमानाला कंटाळून मुख्याध्यापिकेची आत्महत्या; अध्यक्ष-सचिवासह चौघांवर गुन्हे दाखल

Yavatmal News: मानसिक त्रास आणि वारंवार अपमानित करण्यात येत असल्याने एका 58 वर्षीय मुख्याध्यापिकेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
 Yavatmal Crime News
Yavatmal Crime NewsSaam Tv
Published On: 

संजय राठोड, प्रतिनिधी

Yavatmal News:

पेन्शन केसवर सही करणार नाही, म्हणून मानसिक त्रास आणि वारंवार अपमानित करण्यात येत असल्याने एका 58 वर्षीय मुख्याध्यापिकेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Yavatmal Crime News
Nandurbar Crime: वृद्धावर हल्ला करत जबरी चोरी, रोख रकमेसह तब्बल २५ तोळे सोने लंपास; नंदुरबार शहरात खळबळ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगला ढवळे या भांबराजा येथील नेहरू महाविद्यालयात सन 1997 पासून शिक्षक पदावर नोकरी करत होत्या. सन 2018 पासून त्या विद्यालयात मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. तसेच 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांनी महाविद्यालयातील लिपिक अक्षय जयस्वाल याला 15 एप्रिल 2023 रोजी पन्नास हजार रुपये उसनेवारी दिले होते.

त्यापैकी चाळीस हजार रुपये त्याने मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांना परत दिले मात्र उर्वरित दहा हजार रुपये देण्यासाठी तो आज देतो उद्या देतो म्हणत त्रास देत होता. त्याला पैसे परत मागितले असता अपमानित करीत होता. त्याच महाविद्यालयातील सचिव निलेश चव्हाण आणि अध्यक्ष किसन जयस्वाल हे मुख्याध्यापिका मंगला ढवळे यांच्या निवृत्तीच्या फाईलवर सह्या करण्यास तयार नव्हते. (Yavatmal News)

आम्ही तुमच्या पेन्शन केसवर सही करणार नाही असे म्हणून मानसिक त्रास देत असल्याने त्रासाला कंटाळून मुख्याध्यापिका ढवळेंनी आत्महत्या केली. या प्रकरणी मंगला ढवळे यांची मुलगी मोनिका चंदनखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोहारा पोलीसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. अध्यक्ष किसन जयस्वाल, सचिव निलेश चव्हाण, लिपिक अक्षय जयस्वाल आणि सहायक शिक्षक अरुण जाधव अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. (Latest Marathi News)

 Yavatmal Crime News
Manoj Jarange Patil: ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्यांशी मनोज जरांगेंचा संवाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.