Yavatmal : जन्म दाखल्यासाठी फसवणूक; खोट्या कागदपत्रावरून जन्माची नोंदप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील राधाकृष्णनगरी लोहारा येथील रहिवासी वाल्मीकराव महादेवराव मेंढेकर यांचा २० जुलै १९६३ मध्ये लोहारा येथे जन्म झाला होता. यवतमाळ तहसील कार्यालयातील जन्म- मृत्यू रजिस्टरमध्ये त्यांची नोंद होती
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv
Published On

संजय राठोड 
यवतमाळ
: यवतमाळ तहसील कार्यालयातील रजिस्टरमध्ये जन्माची नोंद करण्यासाठी चक्क शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करण्यात आली. ही बाब उघडकिस येताच निवासी तहसीलदार संजय गोरलेवार यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील राधाकृष्णनगरी लोहारा येथील रहिवासी वाल्मीकराव महादेवराव मेंढेकर यांचा २० जुलै १९६३ मध्ये लोहारा येथे जन्म झाला होता. यवतमाळ तहसील कार्यालयातील जन्म- मृत्यू रजिस्टरमध्ये त्यांची नोंद होती. जन्माची नोंद करण्याकरिता वाल्मीकराव मेंढेकर यांनी ३१ सप्टेंबर २०२३ रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. 

Yavatmal News
Nashik Crime : व्यावसायिक अपहरणाची उकल; चौघांना घेतले ताब्यात, रक्कम घेऊन एकजण फरार

शाळेच्या दाखल्यावर खाडाखोड 

रजिस्टरमध्ये नोंद करण्यापूर्वी संपूर्ण कागदपत्राची तपासणी तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मेढेकर यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खाडाखोड केल्याचे स्पष्ट दिसून आले. या दाखल्याबाबत तहसील प्रशासनाच्यावतीने पुन्हा सखोल चौकशी केली असता तो दाखला खोटा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ही बाब तहसीलदार योगेश देशमुख यांच्या लक्षात आणून दिली. 

Yavatmal News
Nashik : वाटेत अंघोळ केल्यावर चक्कर येऊन कोसळले; देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकाचा मृत्यू

अखेर पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान खोटी कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी मेंढेकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी; असे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यानुसार निवासी तहसीलदार संजय गोरलेवार यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून वाल्मीकराव मेंडकार यांच्या विरोधात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com