Yavatmal Crime: अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; यवतमाळ हादरले

Yavatmal Police Station: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Yavatmal Crime: अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; यवतमाळ हादरले
Yavatmal CrimeSaam Tv
Published On

संजय राठोड, यवतमाळ

बीडमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना यवतमाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली . दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमध्ये ३५ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आशिष सोनोने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यवतमाळच्या वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्रनगरमध्ये आज पहाटे चार वाजताच्या सुमारास आशिष सोनोनेची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून चार जणांनी आशिषच्या डोक्यावर दगडाने घाव केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषचा जागीच मृत्यू झाला.

Yavatmal Crime: अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; यवतमाळ हादरले
Crime : बायकोचं मंगळसूत्र चोरलं, पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला दगडाने ठेचला, अकोला हादरलं

या हत्येची माहिती मिळताच यवतमाळच्या लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आशिषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी ४ जणांना अटक केली. अनैतिक संबंधातून आशिषची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यवतमाळ शहरात ८ दिवसांत दोन हत्याकांडाच्या घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Yavatmal Crime: अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; यवतमाळ हादरले
Beed Crime: 'दादा'ला दोन दिवस झाडावर लटकवलं, नंतर अमानुष मारहाण अन्...; विकाससोबत घडलेलं कृत्य भावानं रडत रडत सांगितलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com