अखेर बेपत्ता 'मानवी'चा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; घातपात की, पडून मृत्यू?

यवतमाळच्या आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (डू) या गावातील तीन वर्षाची मानवी २० तारखेपासून बेपत्ता झाली होती.
अखेर बेपत्ता 'मानवी'चा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; घातपात की, पडून मृत्यू?
अखेर बेपत्ता 'मानवी'चा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; घातपात की, पडून मृत्यू?संजय राठोड
Published On

-- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (डू) या गावातील तीन वर्षाची मानवी अविनाश चोले हि चिमुरडी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाली होती. या चिमुकलीचे अपहरण (Kidnapping) झाल्याचा अंदाज सुरुवातील व्यक्त कऱण्यात येत होता.

हे देखील पहा :

मात्र, दुर्दैवाने आज तिचा मृतदेह पाहण्याची वाईट वेळ तिच्या आई-वडिलांवर आली आहे. २० डिसेंबर या दिवसापासून घरासमोर खेळणारी तीन वर्षाची चिमुकली अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, लहान मुलांची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा मेसेज देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत होता. या प्रकरणात पोलिसांनी (police) अपहरणाचा गुन्हा ही दाखल केला होता.

अखेर बेपत्ता 'मानवी'चा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; घातपात की, पडून मृत्यू?
यवतमाळमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण; आईवडील व्याकुळ!

तिचा मृतदेह आज मिळून आल्यानंतर काही वेळा पुर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांनी कुऱ्हा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर अविनाश चोले यांच्या घरा मागील पाण्याच्या टाक्यात मानवीचा मृतदेह आढळून आला आहे. मानवीसोबत घातपात झाला आहे की, पाण्याच्या टाक्यात पडून तिचा मृत्यू झाला आहे. याबद्दल पोलीस तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com