जालना : कोरोना विषाणूचा नवीन अवतार असलेल्या एक्सई व्हेरीयंटचा (XE Variant) रुग्ण आज गुरातमध्ये आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. मुंबईमधून (Mumbai) गुजरातला (Gujrat) गेलेल्या एका व्यक्तीचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. त्याआधारे सदर रुग्णामध्ये एक्सई व्हेरीयंट आढळून आला. याबाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी बोलताना माहिती दिली. एक्सई हा व्हेरियंट तितकासा घातक नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. (XE variant patient found in Mumbai!)
हे देखील पहा :
दरम्यान, केंद्र सरकारकडून आज 5 राज्यांना पत्र पाठवण्यात आले असून कोरोना विषाणूच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु, राज्यात कोरोना स्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डॉस देण्याची जबाबदारी पूर्णतः सरकारची असून आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या लसी खाजगी दवाखान्यात देखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोविशील्ड ६०० रुपये तर, कोव्हॅक्सिन २५० रुपयांना उपलब्ध असेल.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसींचा बूस्टर डोस दिल्यानंतर दोन डोस आणि बूस्टर डोस मधील अंतर हे ९० दिवसांचे असणार आहे. १५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय राज्यमंत्रिमंड्ळाने घेतला आहे. ज्याला बूस्टर डोस घ्यायचा आहे त्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन शासकीय दरांप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. खाजगी रुग्णालयांनीही लस साठवणुकीबाबत योग्य ती काळजी घ्यावी असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.