मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; तीन दिवसांनी सापडला मृतदेह!

प्रत्यक्षदर्शी त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मासेमारी करताना सुनिल गावित हा पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले.
मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा तीन दिवसांनी सापडला मृतदेह!
मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा तीन दिवसांनी सापडला मृतदेह!SaamTvNews

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील भरडू (Bhardu) येथील नागन मध्यम प्रकल्प (Nagan Dam) धरणात मासेमारी करणारा चितवी येथील सुनिल हिरालाल गावित 35 वर्षीय तरुण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाल्याने दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता, स्थानिक पातळीवर शोधकार्य सुरू होते. पाण्यात बेपत्ता तरुणाचा तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला. ( Navapur Bhardu Village Nagan Dam deathbody of youth found three days later)

हे देखील पहा :

नवापुर (Navapur) तालुक्यातील भरडु येथील नागन मध्यम प्रकल्प धरणात गुरुवारी (दि. 7 एप्रिल) दोन वाजेच्या सुमारास चितवी येथील सुनील हिरालाल गावित (वय 35) हा हर्षल राजु गावित रा. वडसत्रा, तुषार जितेंद्र गावित, सुनिल भरत गावित, हिरा रतिलाल गावित सर्व रा. चितवी मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता सुनिल गावित हा युवक पाण्यात मासेमारी करण्यासाठी उतरला असता त्याच्या कमरेला मासेमारी पकडण्याची जाळी बांधलेली होती. त्या अवस्थेत तो धरणाच्या पाण्यात उतरला त्याचे मित्र हे दुसर्‍या दिशेने पाण्यात उतरले.

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा तीन दिवसांनी सापडला मृतदेह!
आपल्याला सत्ता हवीय, जनतेचे कल्याण करण्यासाठी - फडणवीस

धरणाच्या (Bharu Dam) किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये झाडेझुडपे व वेलीची जाळे असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ आहे. प्रत्यक्षदर्शी त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मासेमारी करताना सुनिल गावित हा पाण्यात बुडाल्याचे (Drowned) निदर्शनास आले. त्यावेळी धरणाच्या पाण्यात स्थानिक गावकरी व त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. लागलीच विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. सदरच्या घटनास्थळी विसरवाडी पोलीस (Visarvwadi Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश येलवे, विश्वनाथ नाईक, लिनेश पाडवी यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी दि. 7 एप्रिल सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा तीन दिवसांनी सापडला मृतदेह!
सदावर्ते यांच्या अटकेचा ST कर्मचाऱ्यांकडून निषेध

मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये शेवाळ व वेली असल्यामुळे त्या ठिकाणी शोध कार्य घेण्यासाठी देखील मोठे जिकरीचे असल्याने रात्रीच्या वेळेस ते शक्य न झाल्याने त्यांनी पुन्हा दुसर्‍या दिवशी दि. 8 एप्रिल शुक्रवार रोजी पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सदरील घटनेत बेपत्ता युवकाचे शरीर आढळून आले नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी सकाळी सुनिल गावित या तरुणाचा मृतदेह पाण्यावर आल्यानंतर स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनामार्फत त्याला बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. चितवी येथील मयत सुनिल गावित यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असून घरातील कमावत्या व्यक्ती गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

𝕰𝖉𝖎𝖙𝖊𝖉 𝕭𝖞 : 𝕶𝖗𝖚𝖘𝖍𝖓𝖆𝖗𝖆𝖛 𝕾𝖆𝖙𝖍𝖊

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com