Accident News : अंगावर काटा आणणारा अपघात; महिलेस चिरडलं, ३० फुट नेलं फरफटत

आज सकाळी झाला भीषण अपघात.
Accident , Aurangabad, Women
Accident , Aurangabad, WomenSaam Tv

- नवनीत तापडिया

Aurangabad Accident News : देवदर्शनासाठी निघालेल्या एका महिलेचा औरंगाबाद (aurangabad) नजीक अपघातात (accident) मृत्यू झाला आहे. या अपघातग्रस्त महिलेस वाहनानं चिरडलं आणि त्यानंतर सुमारे ३० फुट फरफटत नेल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

औरंगाबाद जवळील वाळूज उद्योग नगरीतील वैष्णवीदेवी मंदिरात दर्शनासाठी चालेल्या महिला भाविकास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. ही घटना पंढरपूर भाजी मंडई समोर घडली. (Latest Marathi News)

Accident , Aurangabad, Women
Sangli : दुचाकीवरुन तिघे आले अन् म्हसोबा मंदिराजवळील युवकाला भाेसकून गेले

या भीषण अपघातात मंगलबाई विठ्ठल शहाणे (सिडको महानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुभद्राबाई तुळशीराम राऊत (सिडको वाळूज महानगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोघींना पाठीमागून जोराची धडक दिली.

Edited By : Siddharth Latkar

Accident , Aurangabad, Women
Court : न्यायालयाच्या आदेशानंतर वकिलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com