Court : न्यायालयाच्या आदेशानंतर वकिलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल

त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.
Court, Latur
Court, LaturSaam Tv
Published On

Latur : खाेटा सातबारा तयार करुन त्या माध्यमातून फसवणूक केल्याची घटना लातूर जिल्ह्यात नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाेन वकिलांसह सहा जणांवर पाेलीसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चर्चा लातूरसह अन्य जिल्ह्यात जाेरदार सुरु आहे. (Latur Latest Marathi News)

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यात दाेन वकिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट तयार केलेल्या 2011 मधील सातबाराचा वापर 2019 मध्ये करण्यात आला. त्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली असे निदर्शनास आले. न्यायालयानं (court) दिलेल्या आदेशानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Court, Latur
School : ताेपर्यंत साेडणार नाही ! मुख्याध्यापकासह विस्तार अधिका-यास कोंडलं

येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रीराम अर्जुन मदने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लातूर येथील वकील श्रीकांत एकनाथ मदने, लखन एकनाथ मदने, आकाश एकनाथ मदने, मंगल एकनाथ मदने, सुशीला एकनाथ मदने आणि संभाजीनगर येथील विधीज्ञ सविता एकनाथ मदने यांचा समावेश आहे. (Maharashtra News)

Court, Latur
Crime News : 'मी वकील आहे, तुमची नोकरी खाऊन टाकेन' महिलेस धमकी, दांपत्य अटकेत

बसवंतपूर शिवारातील गट नं. 39 मधील शंकरराव मदने यांच्याकडून जमीन (36.42 आर) खरेदी करण्यात आलेली होती. फिर्यादीच्या नावची (10 आर) जमीन सातबारामध्ये कमी दाखवण्यात आली. सन 2011 मध्ये हा सातबारा तयार करण्यात आला आणि त्याचा वापर करून 2019 मध्ये संभाजीनगर खंडपीठात दावा दाखल करण्यात आलेला होता. त्यासाठी वापरण्यात आलेला सातबाराच खोटा आणि बनावट होता.

Court, Latur
Garba : गरबा खेळणा-या महिलांचे काढले २५० फोटो; चाैघे अटकेत

त्यामुळे फिर्यादीची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आलीच परंतु न्यायालयाचीही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी लेखी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतरही त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध (भादवि कलम 465, 466, 468, 471, 34 अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Court, Latur
Swabhimani Shetkari Sanghtana : बैठक सुरु असतानाच 'स्वाभिमानी' चा राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com