Sangli : दुचाकीवरुन तिघे आले अन् म्हसोबा मंदिराजवळील युवकाला भाेसकून गेले

ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
sangli crime news , crime news
sangli crime news , crime newssaam tv
Published On

Sangli Crime News : सांगली येथील कर्नाळ रस्ता परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाचा (youth) धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. अजित बाबुराव अंगडगिरी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

अजित अंगडगिरी याला पूर्वीच्या वादातून मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या रडारावर आहेत. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

sangli crime news , crime news
Pune : पुणेकरांनो ! इकडे लक्ष द्या, चांदणी चौक पूल पाडताना शहरातील 'या' मार्गावरील वाहतूक बंद

अजित हा काल सायंकाळी शेतामध्ये कुटुंबियांसोबत औषध फवारण्याचे काम करत होता. यावेळी तीन तरुण दुचाकरून तेथे आले. या तिघांनी अजितला बोलावून घेतले. त्यापैकी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने छातीवर एकच वार केला. त्यात अजित रक्ताच्या थारोळ्यात पडला.

sangli crime news , crime news
Sangli : द्राक्ष बागायतदार चिंतेत; शिंदे - फडणवीस सरकारला घातलं साकडं

त्यानंतर ते तिघे पळून गेले. अजितला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपासणी करीत होते. पोलिसांनी सूत्रे फिरवत पूर्वीच्या भांडणातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या (police) रडारावर आहेत.

Edited By : Siddharth Latkar

sangli crime news , crime news
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com