Sangli : द्राक्ष बागायतदार चिंतेत; शिंदे - फडणवीस सरकारला घातलं साकडं

द्राक्षशेती हळूहळू आणखी संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
sangli, Grapes, farmer
sangli, Grapes, farmersaam tv
Published On

Sangli News : द्राक्ष बागांमधील छाटण्या रखडल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. सततच्या पावसाने खोळंबा झाल्याचे शेतक-यांचे (farmers) म्हणणे आहे. दरम्यान यंदा पुन्हा द्राक्ष बागायतदारांपुढे संकट निर्माण झाल्याने हा सिझन देखील वाया जाणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील जवळ जवळ सर्रास द्राक्ष बागांची छाटणी रखडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस (rain) व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष छाटणी रखडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज असल्याने द्राक्ष बागायतदारांपुढे पुन्हा संकट निर्माण झाले आहे.

sangli, Grapes, farmer
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

सांगली जिल्ह्यात द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष छाटणी रखडली आहे. त्यातच डिसेंबर ते जानेवारीपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने यावर्षीही द्राक्षबागांच्या पीक छाटण्या लांबण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदारांची सप्टेंबरमध्ये छाटण्या घेऊन धोका पत्करण्याची मानसिकता राहिलेली नाही. द्राक्षशेती हळूहळू आणखी संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

sangli, Grapes, farmer
PFI च्या कार्यकर्त्यास नांदेडमध्ये अटक; एटीएसची कारवाई

शेतकऱ्यांनी द्राक्षशेतीत चांगली प्रगती केली आहे. मात्र गेल्या तीन - चार वर्षांपासून अडचणीत आली आहे. द्राक्ष बागांमध्ये अद्यापही पीक छाटणी सुरू नाही. दलालांकडून लुबाडणूक , द्राक्षाला अपेक्षित दर न मिळणे , लहरी हवामान आणि गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फार मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. शासनाने द्राक्ष बागायतदारांना आर्थिक सहाय्य करावे, कर्जाचे व्याज माफ करावे, औषधे, खते यांचे दर कमी करावेत अशी मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

sangli, Grapes, farmer
NCP : खासदार सुप्रिया सुळेंची शिष्टाई; एनसीपीतील दाेन गटाचा वाद मिटला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com