Akola News : बाळ CCUमध्ये, आई अचानक झाली बेपत्ता; चार दिवसांनी रुग्णालयाचं टॉयलेट उघडलं अन्...

Akola Hospital News: महिलेने जीवन का संपवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Akola hospital
Akola hospital Saam TV
Published On: 

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. महिलेने रुग्णालयातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. महिलेने जीवन का संपवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेचं बाळ सीसीयूमध्ये भरती होते. मात्र बाळावर उपचार सुरु असतानाच ही महिला बेपत्ता झाली होती. बाळाला सोडून महिला कुठे गेली याचा कुणालाही पत्ता लागत नव्हता. महिलेचा शोध सुरू होता, पण ती कुठेच सापडली नाही. चार दिवस उलटले तरीही तिचा शोध लागत नव्हता. (Latest News Update)

Akola hospital
Rahul Gandhi : राहुल गांधींना ब्रिटनमधील वक्तव्य भोवणार? खासदारकी जाण्याची शक्यता, नियम काय सांगतो?

महिलेच्या घरची मंडळीही चिंतेत होती. रुग्णालयातील एका शौचालयाचे दार बंद असल्याचं आढळून आलं. तिथून दुर्गंधी देखील येत होती. रुग्णालय प्रशासनाला लोकांनी याबाबत कळवलं. रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना पाचारण केलं.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शौचालयाचं दार तोडलं. तेव्हा सारेच हादरले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शौचालयातच या महिलेने आत्महत्या केली होती. चार दिवसांपासून महिलेच्या बाळावर CCU मध्ये उपचार सुरु होते. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com