

बाळू तुपे हत्या प्रकरणात कॅप्टन खरात याचा हात होता?
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बाळू तुपे पत्रकार म्हणून करत होता काम
बाळू तुपे याने खरात प्रकरणी वृत्तांची सदर मालिका सुरू केली होती.
अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरुन दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आज अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरातने 2007 साली एका पत्रकाराची हत्या घडवून आणली होती. आव्हाड यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रकाराच्या हत्याचा खुलासा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करण्यासाठी ३८ आमदारांनी आपल्या हाताती बोटं कापल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान २००७साली खरातनं ज्या पत्रकारची हत्या केली तो कोण होता हे जाणून घेऊ.
बाळू तुपे नाशिकमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम करत होता. नाशिकमधील गुन्हेगारांसोबत त्याची उठ बस होती. त्यांच्याशी त्याची ओळख होती. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शहरातील अवैध धंद्यांवरून ब्लॅकमेल करायचा. नाशिकमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये बाळू तुपे यांनी कॅप्टन खरातविरोधात 2005 साली एक सदर चालवले होते. याच दरम्यान बाळू तुपे या पत्रकाराची हत्या झाली होती.
नाशिकच्या स्टेट बँक परिसरात लावण्यात येणाऱ्या एका होर्डिंगवरून झालेल्या वादातून बाळू तूपेची हत्या झाली होती. बाळू तुपे या हत्या प्रकरणात ८ जणांना संशयित आरोपी करण्यात आलं होतं. कुणाल रोकडे, संदीप रोकडे, राकेश रोकडे, चंद्रकांत निकम, अमित बोरुडे, शकील अन्सारी , सागर पगारे, पवन जाधव अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मात्र या सर्व संशयितांची निर्दोष म्हणून सुटका झाली होती. मात्र आता याच बाळू तुपे हत्या प्रकरणात कॅप्टन खरात याचा हात होता, असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मात्र निर्दोष सुटलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात आमचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. आम्ही कोणत्याही कॅप्टन खरातला ओळखत नाही त्यावेळेला कॅप्टन खरात हे नाव कोणाला माहित देखील नव्हतं. बाळू तुपे यांच्या हत्या देखील आमचा संबंध नव्हता म्हणून आम्हाला न्यायालयाने निर्दोष सोडलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.