प्रफुल्ल पटेलांचे PA ते खासदार, सुनेत्रा पवारांनी संधी दिलेले राजेंद्र जैन कोण? पाहा A टू Z माहिती

Rajendra Jain, Rajya Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुरुवात केलेल्या जैन यांचा 'पीए ते खासदार' हा प्रवास, त्यांचे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील योगदान जाणून घ्या.
who is Rajendra Jain NCP leader
who is Rajendra Jain NCP leaderSaam TV Marathi
Published On

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

who is Rajendra Jain NCP leader : सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर भंडारा-गोंदियातील राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना, त्यांना डावलून ऐनवेळी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

एकेकाळी प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे राजेंद्र जैन आता थेट संसदेत पाऊल ठेवणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र जैन यांचा 'पीए ते खासदार' हा प्रवास नेमका कसा होता? त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊयात...

who is Rajendra Jain NCP leader
सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळांना खासदारकी का दिली नाही? समोर आले 'हे' मोठे कारण, वाचा इनसाईड स्टोरी

गोंदिया जिल्ह्यातील राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या ते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच 'गोंदिया शिक्षण संस्थे'चे (गोंदिया एज्युकेशन सोसायटी) सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (महासचिव) म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

who is Rajendra Jain NCP leader
Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

सहकार क्षेत्रावर राजेंद्र जैन यांची मजबूत पकड आहे. त्यांनी दोनदा भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय, विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओळखले जातात.

who is Rajendra Jain NCP leader
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय वावर आणि राजकीय प्रभाव वाढत गेला. राजकीय क्षेत्रासोबतच राजेंद्र जैन यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. विदर्भातील एक नामांकित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोंदिया एज्युकेशन सोसायटी'चे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे काम पाहिले आहे. राजेंद्र जैन आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाणार आहेत.

who is Rajendra Jain NCP leader
Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com