ST Mahamandal: एसटी बसने कोणाला मोफत प्रवास करता येतो? जाणून घ्या सविस्तर

MSRTC News: एसटीने रोज अनेक लोक प्रवास करतात. महिलांना एसटीच्या तिकीटावर ५० टक्के सूट आहे. दरम्यान, अनेकांना मोफत प्रवासदेखील करता येतो.
ST Bus
ST BusSaamTv
Published On

रोज शेकडो प्रवासी लालपरीने प्रवास करतात. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीटात ५० टक्के सूट आहे. तर अनेकांना एसटीच्या तिकीटावर १०० टक्के सूट मिळते.म्हणजेच काहीजण एसटीने फुकट प्रवास करु शकतात.

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वी मासिक पास दिला जायचा. या पासमध्ये सवलत दिली जायची. तसेच प्रवाशांना त्यांना हवे असेल तर तीन महिन्याचा पास दिला जायचा. यात फक्त ५० दिवसांचे तिकीटाचे पैसे घेतले जायचे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला खूप फायदा व्हायचा. तर अनेकांना बसच्या तिकीटावर आणि पासवर १०० टक्के सवलत मिळते.

ST Bus
PMPML Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार, ST पाठोपाठ आता PMPMLचे तिकीट दर वाढणार

एसटीने मोफत कोणाला प्रवास करायला मिळतो?

स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे एक साथीदार वर्षभर एसटीने मोफत प्रवास करु शकतात. साधी व निमआराम एसटीच्या तिकीटावर १०० टक्के सूट मिळते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांच्यासोबत एक साथीदार वर्षभर मोफत प्रवास करु शकतात. साधी व निमआराम एसटी बसने ते मोफत प्रवास करु शकतात.

अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे ५वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना एसटीने मोफत प्रवास करता येतो.

शासन अधिस्कीकृतीधारकर पत्रकारांना साधी, निमआराम, शिवशाही (शयनयान) एसटीने ८००० किमीपर्यंत मोफत प्रवास करु शकतात.

राज्यातील ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व बस तिकीटांवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व बस तिकीटांवर १०० टक्के सूट मिळत असते.

विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये ६६.६७% टक्के सूट मिळते.

विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे येणार्‍या बसमध्ये तिकीटावर ५० टक्के सूट मिळते.

४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अंध किंवा दिव्यांग असलेल्या व्यक्तींना तिकीटावर ७० ते ७५ टक्के सूट मिळते.

क्षय रोग, कर्करोग,कुष्ठरोग असलेल्या नागरिकांसाठी बसच्या तिकीटावर ७५ टक्के सूट मिळते.

अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त खेळाडूंना साधी, निमआराम, वातानुकुलित बसच्या तिकीटावर १०० टक्के सूट मिळते.

ST Bus
Vande Bharat : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा

आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे साथीदार वर्षभर साधी आणि निमआराम एसटीतून फुकट प्रवास करु शकतात.

पंढरपूर आषाढी- कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचा मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे.

विद्यमान विधानमंडळ सदस्य आणि त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे.

माजी विधान मंडळ सदस्य आणि त्यांचे एक साथीदार यांनाही मोफत प्रवास करता येणार आहे.

ST Bus
Women Savings Scheme India: 'ही' सरकारी योजना महिलांसाठी ठरतेय खास, गुंतवणुकीवर व्याज मिळते जास्त, २ वर्षांत जबरदस्त कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com