PMPML Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार, ST पाठोपाठ आता PMPMLचे तिकीट दर वाढणार

PMPML Bus Ticket: एसटीनंतर आता पुण्यातील पीएमपीएमएल बसच्या तिकीटाच्या दरामध्ये देखील वाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत पीएमपीच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
PMPL Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार, ST पाठोपाठ आता PMPLचे  तिकीट दर वाढणार
PMPML Busgoogle
Published On

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटीपाठोपाठ आता पुण्यातील पीएमपीएलची तिकीट दरवाढ होणार आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किंमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची संचलन तूट २०१६-१७ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये तब्बल ४९६.४४ कोटींनी वाढ झाली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पीएमपीच्या खर्चाचा डोलारा वाढत चालल्याने भाडेवाढ अटळ मानली जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण १,७०० बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. यातून दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात.

प्रवासी वाहतूक आणि इतर माध्यमातून पीएमपीला २०२३-२४ मध्ये ६६९ कोटींचे उत्पन्न मिळाले. २०२२-२३ च्या तुलनेत उत्पन्नात ६० कोटींनी वाढ झाली आहे. याच वर्षात पीएमपीचा एकूण खर्च १ हजार ४६७ कोटी रुपये झाला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत खर्चात मात्र १५३ कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत पीएमपीच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकारक करणारी आणि त्यांच्या खिशाला परवडणारी 'लालपरी' अर्थात एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. एसटीच्या तिकीट दरामध्ये १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. २५ जानेवारीपासू ही भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com